कै. डॉ. वसंतराव वांकर व डॉ. कुसुमताई वांकर दाम्पत्या द्वारा पुरस्कृत रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमाला
सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले" ह्या वचनांप्रमाणे सेवासदन संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै. डॉ. वसंतराव वांकर व डॉ. कुसुमताई वांकर दाम्पत्या द्वारा पुरस्कृत रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेचे १९८६ साली बीज रोवले, सेवासदन संस्थेच्या आद्य संस्थापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कै. रमाबाई रानडे ह्यांच्या स्मृतीस डॉ. वांकर दाम्पत्याने वाहिलेली आदरांजली म्हणावी लागेल. विविध क्षेत्रातील यजमानांनी या ज्ञानयज्ञात ज्ञानसमिधा टाकल्या आहेत. मृणाल गोरे, शांताबाई किर्लोस्कर राष्ट्रसेविका समितीच्या आदरणीय प्रमिलाताई मेढे, जैन साध्वी मधु स्मिताजी, डॉ. राणी बंग, श्री. विवेकजी घळसासी, श्री. मुकुलजी कानिटकर, श्री अविनाश धर्माधिकारी, श्री. सुनीलजी आंबेकर ह्या व अनेक विद्वतरत्नांनी ही व्याख्यानमाला गुंफली आहे.
सेवासदन शिक्षण संस्थेच्या छात्रांसाठी असलेल्या ह्या व्याख्यानमालेची कवाडे नागपूरकरांसाठी खुली झाली ती अनाथांची माय असलेल्या के. सिंधुताई सपकाळ ह्यांच्यामुळे त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागपुरातील स्त्री/पुरुषांनी संस्थेत गर्दी केली होती व याप्रसंगी लोकांनी त्यांच्या कार्यासाठी भरघोस आर्थिक मदतही केली. अशा या प्रथितयश व्याख्यानमालेसाठी वक्ता शोधणे आणि त्यांच्या तोडीच्या अध्यक्षांना आमंत्रित करणे हा दुग्धशर्करा योग संस्थेने नेहमीच साधला आहे. नागपूरातील नामांकित व्यक्तींनी ह्या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान भूषवून व्याख्यानमालेचा गौरव वाढविला आहे.
संस्थेतील छात्रांना स्त्री समस्यांची जाणीव व्हावी, त्यांच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, निर्णय क्षमता वाढावी तसेच स्त्री शक्तीचा रचनात्मक कार्यासाठी कसा उपयोग होईल ह्याचा ध्यास घेऊन ही व्याख्यानमाला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न करत आहे.
माहेर मेळावा
2 जानेवारी 1927 साली स्थापन झालेल्या सेवासदन शिक्षण संस्थेला मागील 96 वर्षाची भव्य परंपरा आहे. या परंपरेचा एक उपक्रम म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा 'माहेर मेळावा' माहेर मेळावा दर २ वर्षांनी आयोजित केला जातो. या माहेर मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकरीता विभिन्न उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, यामध्ये क्रीडा स्पर्धा, स्वानुभव कथन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. सेवासदन मधून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी हे आज समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. अशा गुणी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल संस्था नेहमीच घेत असते. आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचे आयोजन संस्था "माहेर मेळावा' या उपक्रमातून करीत असते
शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारी व्यक्ती. विविध सामाजिक उपक्रमाद्वारे लोकाभिमुख व संस्कारक्षम शिक्षण-प्रबोधन देणारी व्यक्ती.
पुरस्कार प्राप्त व्यक्ति/ संस्था यांची निवड प्रक्रियाः -
समाजातील प्रतिष्ठीत तथा ज्येष्ठ समाजसेवक, सेवानिवृत्त न्यायमूर्ति, दोन शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार अशा पाच सदस्यीय समिती व्दारा प्रत्यक्ष कार्याची पाहणी करुन पुरस्कार करिता व्यक्ति/ संस्था यांची निवड करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरूप रूपये ७१,००० रोख राजी, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.