रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कारः
तत्कालीन समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादण्यात आली होती. स्त्रीचे क्षेत्र चूल व मूल एवढेच मर्यादित होते. अशाही काळात स्त्रियांसाठी स्व. रमाबाई रानडे यांनी केलेले कार्य हे आजच्या पिढीसाठी दीपस्तंभा सारखे आहे. यापुढेही रमाबाईच्या कार्याचा वसा असाच अव्याहत चालू राहावा म्हणून विविध क्षेत्रात शिक्षणाचे उल्लेखनीय व भरीव कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना संस्थेच्या वतीने रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले व वर्ष २०१६ पासून हा पुरस्कार संस्थेव्दारा, दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनी प्रदान करण्यात येतो.
हा पुरस्कार एक वर्ष व्यक्तिगत उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी तसेच एक वर्ष संस्थाव्दारा करण्यात येणाऱ्या कार्यासाठी प्रदान करण्यात येतो.
पुरस्काराचे क्षेत्र संपूर्ण विदर्भस्तरीय ग्रामीण व शहरी भाग असे राहील.
शैक्षणिक वातावरण नसलेल्या भागात शैक्षणिक वातावरण निर्माण करणारी व्यक्ती.
शारिरीक व मानसिक दुर्बल घटकांसाठी विशेष कार्य करणारी व्यक्ती.
शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारी व्यक्ती. विविध सामाजिक उपक्रमाद्वारे लोकाभिमुख व संस्कारक्षम शिक्षण-प्रबोधन देणारी व्यक्ती.
पुरस्कार प्राप्त व्यक्ति/ संस्था यांची निवड प्रक्रियाः -
समाजातील प्रतिष्ठीत तथा ज्येष्ठ समाजसेवक, सेवानिवृत्त न्यायमूर्ति, दोन शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार अशा पाच सदस्यीय समिती व्दारा प्रत्यक्ष कार्याची पाहणी करुन पुरस्कार करिता व्यक्ति/ संस्था यांची निवड करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरूप रूपये ७१,००० रोख राजी, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.